Pimpri : मानवाधिकार कमिटीच्या राज्य उपाध्यक्षपदी चंद्रकांत भवारी यांची निवड

एमपीसी न्यूज – नॅशनल अँटी क्राईम आणि भारत सरकारच्या मानवाधिकार कमिटीच्या (महाराष्ट्र) राज्य उपाध्यक्ष पदी चंद्रकांत भवारी यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

भावरी यांनी पुणे जिल्हा एमएससीबी, पुणे वन विभाग भीमाशंकर तसशेच तहसील विभागातील गोर-गरीबांची कामे पूर्ण करून दिली आहे. तसेच वन खात्यात आदिवासी लोकांना जमिनीसाठी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

तसेच आश्रम शाळेतील मुलांना जेवण, पाणी आणि बाथरूमची सोय करून देण्यासाठी कायम लढणार आहे. नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कायम वचनबध्द राहणार आहे, असे निवडीनंतर भावरी यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.