Pimpri : मेट्रोच्या कामासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत मेट्रोच्या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपाचा बदल करण्यात आला आहे. खराळवाडी ते नाशिक फाटा या दरम्यान हे बदल करण्यात आले आहेत.

सोमवारी (दि. 30 डिसेंबर) पहाटे बारा ते मंगळवारी (दि. 31 डिसेंबर) रोजी दुपारी दोन पर्यंत एच.ए कंपनी समोरील मेट्रोच्या पिलरपासून पिंपरीहून पुण्याकडे जाणा-या मार्गावरील वाहतूक खराळवाडी येथून मुंबई-पुणे मार्गावरील ग्रेड सेपरेटरमध्ये वळवण्यात आली आहे. हा बदल नाशिक फाट्यापर्यंत राहील.

_MPC_DIR_MPU_II

खराळवाडी येथून एच. ए कंपनी वसाहतीकडे जाणा-या वाहनांना सेवा रस्त्याने जाता येईल. एच ए कंपनीसमोरील अंडरपास नेहरूनगरकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला राहील. मात्र, पुण्याकडे जाणारा मार्ग बंद राहील.

तसेच गुरुवारी (दि. 2 जानेवारी) सकाळी सात ते शनिवार (दि. 4 जानेवारी) सकाळी सातपर्यंत मेट्रोच्या कामासाठी एच ए कंपनी समोरून पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक नाशिक फाटा येथून उलट दिशेने खराळवाडी पर्यंत जाईल. त्यानंतर पुणे मुंबई लेनवरून वाहतूक सुरळीत होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.