Pimpri : मेट्रोच्या कामासाठी जुना पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – जुना पुणे-मुंबई महामार्गावर पुणे मेट्रोचे काम सुरु आहे. पुढील काही दिवस काँक्रीटचे सेगमेंट उचलण्याचे काम करण्यात येणार असल्याने मुंबईकडे जाणा-या लेनवरील ग्रेड सेपरेटरमधील वाहतूक सर्व्हिस रोडवर वळविण्यात आली आहे. हा बदल 7 डिसेंबर पासून पुढील 30 दिवस असणार आहे.

जुना पुणे-मुंबई महामार्गावर शंकरवाडी येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंप ते हिंदुस्थान अँटिबायोटिक्स दरम्यानची ग्रेड सेपरेटर मधील वाहतूक सकाळी 11 ते दुपारी पाच आणि रात्री अकरा ते पहाटे पाच या कालावधीत सर्व्हिस रस्त्यावर वळविण्यात आली आहे. हा बदल 7 डिसेंबर (शनिवार) पासून पुढील 30 दिवस असणार आहे. याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिले आहेत.

पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बि-हाडे म्हणाले, “पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. शंकरवाडी ते हिंदुस्थान अँटिबायोटिक्स या दरम्यानच्या मेट्रो मार्गावर काँक्रीट सेगमेंट उचलण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी हा बदल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त इतर वाहतूक सुरळीत सुरु राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.