Pimpri : छावा मराठा संघटनेचा शुक्रवारी राज्यस्तरीय मेळावा; मराठा आरक्षणप्रश्नी महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांचा होणार सन्मान

एमपीसी न्यूज -आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छावा मराठा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा शुक्रवारी (दि.30 ऑगस्ट) नाशिक येथे होणार आहे. मेळाव्याला पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा कोकण संपर्कप्रमुख रामभाऊ जाधव यांनी केले आहे.

या मेळाव्यात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर पदाधिका-यांनी मार्गदर्शन करतील. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींना ‘मराठारत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.

यामध्ये माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार जितेंद्र आव्हाड, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

याबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीत संघटनेची नेमकी भूमिका काय असणार आहे, यावर विचारमंथन होणार आहे, असेही रामभाऊ जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.