Pimpri : ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जयघोषणाने दुमदुमली उद्योगनगरी

एमपीसी न्यूज – ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जयघोषाने पिंपरी-चिंचवड शहर (मंगळवार) दुमदुमून गेले होते.. जगभरात ज्यांच्या कुशल राज्य कारभाराची ओळख आहे, अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर घराघरांत व्‍हावा, असे मत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष योगेश गवळी यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने शिवजयंती निमित्त भोसरी येथील पीएमटी चौकात मंगळवारी (दि.१९) विविध कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पार्पण सोहळा पार पडला. तसेच, परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीरही घेण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पिंपरी-चिचंवड कार्याध्यक्ष योगेश पंडित गवळी यांनी केले होते.

  • यावेळी कार्यक्रमाला माजी नगरसेवक पंडित आबा गवळी, जालिंदर शिंदे, नगरसेविका प्रियंका बारसे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर, तसेच निवृत्ती शिंदे, भरत लांडगे, गोपी धावडे, ह.भ.प. राजाराम महाराज फुगे, ह.भ.प. हरिभाऊ लोंढे, बाळु धावडे, सुदाराम माने, संतोष फुगे, अंकुश लोंढे, संतोष लांडगे, उमेश लोंढे, अमर फुगे, सचिन कंद, गणेश कंद, अतुल फुगे, स्वप्नील फुगे, निवृत्ती भोसले, विशाल काळभोर आदी उपस्थित होते.

आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ८५ नागरिकांनी रक्तदान केले. सुमारे ३०० नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली. सामन्य तपासणीचा ५०० हुन अधिक नागरिकांनी लाभ घेतला. तसेच ३५० नागरिकांनी दातांची तपासणी केली. याबरोबरच मेमोग्राफी व सर्व्हिकल कॅन्सर स्कॅनिंगद्वारे २५० हून अधिक महिलांनी तपासणी करून घेतली. यावेळी शिबिराला सुमारे २ हजार नागरिकांनी भेट दिली. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मसोहळा साजरा करण्यात आला. यावेळी अश्वरुढ पुतळ्याचे पुजन आबा खराडे व कृष्णा लोखंडे यांनी केले. शाहीद शेख व राजाराम जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. चिंचवड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष संदेश नवले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मसोहळा साजरा करीत असताना, महाराजांनी सर्व-धर्म-समभाव आदर्शाचा विचार दिलेला आहे. तीच विचारधारा घेऊन, काॅग्रेसच्या कार्यकर्त्यानी जनतेपर्यंत पोहचवली पाहिजे. यावेळी बापू लोखंडे, रवी साबळे, आदनान शेख, विनोद रत्नम, प्रदीप पवार, रोहित शेळके व पिंपळे गुरवचे कार्यकर्ते उपस्थित होते.

  • पिपंळे गुरव शहिद भगतसिंग चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रम घेतला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आशीष जाधव यानीं शिवाजी महाराजां बद्दल संक्षिप्त स्वरुपात पण खुप महत्वाची माहीती देवुन सर्व बांधवाना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दीक शुभेच्छा देवुन सर्व नागरीकांनी ऐकत्र येऊन दि गुड पिपल्स फौंडेशन शुभचिंतक व मित्र परीवार यांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली . यावेळी दत्तात्रय जगताप, आशीष जाधव, रमेश काशीद, नवनाथ बिडकर, निखील कदम, अन्वर शेख, बबलु जगताप, विजय खदाडे, रुषीकेश खोपकर, तसेच विशाल खुने आदी उपस्थित होते.

शिवचरित्र” सातासमुद्रपार उज्वल यशोगाथा म्हणून गौरविले जात आहे.जागतिक पातळीवर अनेक देशांच्या विद्यापीठांमध्ये शिवछत्रपतींचे राज्यशासन अभ्यासले जात आहे. इतिहासातील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या गौरवशाली चरित्रामुळे वाचन संस्कृती जागतिक पातळीवर प्रबळ बनत आहे. शिवजयंतीनिमित्त विजय कॉलनी गंगानगर येथे आयोजित केलेल्या “शिवचरित्र” प्रति वाटप कार्यक्रमात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते.

  • याप्रसंगी प्रमुख उपस्थिती संतोष चव्हाण,गणेश मुळीक,प्रमोद परब,अक्षय जाधव,शुभम वाघमारे,अजय लुगडे,राहुल खराडे,सुशांत गायकवाड,चंद्रकांत पाडेकर, रॉनी फाजंगे,सागर संदनशिव उपस्थित होते. नुकताच पुलवामा येथे भ्याड दहशतवादी हल्ला झाला.शहीद सीआरपीएफ जवानांना आज रोजी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तसेच शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करून शहीद जवानांनकरिता मदतनिधी उभा करण्याचे कार्य गंगानगर पेठ क्रमांक २८ – विजय कॉलनीतील गणेश मित्र मंडळाचे सदस्य करीत आहेत. अश्याच पद्धतीने साईराज कॉलनी बिजलीनगर येथेसुद्धा शिवजयंती साजरी करण्यात आली.

शालेय विद्यार्थ्यांना धैर्य सामाजिक संस्थेचे ओंकार उत्तेकर व सामाजिक कार्यकर्ते उमाकांत सोनवणे यांच्या हस्ते छत्रपतींच्या शिवचरित्र प्रतिचें वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन रुपम खर्चे, बाळासाहेब घोळवे,योगीराज फुलसागर, सौरभ येठे, चिन्मय चौधरी,राहुल भोसले,साहिल गिरी,ओंकार पाटील,श्रीयश खर्चे, श्याम देसले,धनंजय खर्चे, मधुर माने,मनोहर पाटील,निलेश चोपडे,सुधीर राणे,सिद्धांत सोनवणे, संदीप खर्चे यांनी केले.

  • पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाच्या अजमेरा येथील कार्यालयात शिव जयंती साजरी करण्यात आली. ” सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे आणि अशोक मंगल यांनी शिवाजी महाराजांची प्रतिमेचा पूजन करून पुष्पहार अर्पण केले. सर्व उपस्थितांनी पुष्प अर्पण केले. ह्यावेळी दहा वर्षीय वैष्णवी काकडे यांनी शिवाजी महाराजांचा इतिहासाचा विस्तृत विवरण आपले उदगारात दिले. त्यांची ओजस्वी वाणीचा सर्वांनीं टाळ्या वाजून स्वागत केले. पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण मंडळांचे माजी सभापती अर्जुन बाबुराव ठाकरे तसेच उमेश बनसोडे,संदेश नवले यांनी आपापले विचार व्यक्त केले. अशोक काळभोर यांनी आभार प्रदर्शन केले.

लांडेवाडी चौकात शिवाजी महाराजांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. ह्यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मंगल, शिक्षण मंडळांचे माजी सभापती अर्जुन बाबुराव ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे महासचिव अमर नाणेकर, सचिव अशोक काळभोर, सचिव उमेश बनसोडे, चिंचवड ब्लॉक काँग्रेसचे संदेश नवले, प्रवीण काकडे, आबा खराडे, पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष सतीश बोर्डे, सचिव राजेश नायर, दिलीप पालेकर, आरुष पालेकर, रोहन वाघमारे, मिताली चक्रवर्ती, वैशाली नलगे, जयश्री कनाइके, वैष्णवी काकडे,अमृत बहादुर, सुरेश कानिटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • शिवजयंतीच्या निमित्ताने महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय या संस्थेच्या वतीने नेहरूनगर, पिंपरी येथील पदमश्री वसंतदादा पाटील माध्यमिक शाळा येथे 16 फेब्रुवारीला क्रांतिकारकांची माहिती असलेले सचित्र फ्लेक्स प्रदर्शन (क्रांतिगाथा प्रदर्शन)लावण्यात आले होते. अनेक क्रांतिकारकांनी आपला देश स्वतंत्र होण्यासाठी इंग्रजांशी लढा दिला व आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

अशा क्रांतिकारकांच्या त्यागाची व शौर्याची आठवण विद्यार्थ्यांना व्हावी व विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम व देशाभिमान जागृत होऊन वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे आयोजन महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय या संस्थेचे कार्यकर्ते विश्वनाथ अवघडे, सुभाष अंभोरे, शशिकला अवघडे यांनी केले.

  • या उपक्रमासाठी वसंतदादा माध्यमिक शाळेचे संस्थापक माजी महापौर हनुमंत राव भोसले व शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता काळे यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रदर्शनाचे लाभ शाळेतील 300 हुन अधिक विद्यार्थांनी घेतला. असाच क्रांती गाथा प्रदर्शनाचा उपक्रम महेश नगर पिंपरी येथील प्रथमेश हायस्कुल या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 18 फेब्रुवारीला आयोजित केला होता. या शाळेतील 300 विद्यार्थ्यांनी या उपक्रमाची लाभ घेतला. प्रथमेश स्कुलच्या संस्थपिका कल्पना पोतदार, मुख्याध्यापक संभूस सर तसेच शिक्षकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.