BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri chichwad : अंजली रानवडेची सायकलिंगसाठी इंडिया कॅम्पमध्ये निवड

दिल्ली येथे घेणार प्रशिक्षण; राष्ट्रीय स्तरावरील कामगिरीची घेतली दाखल

255
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडच्या अंजली अशोक रानवडे हिची ऑक्टोबर 2019 मध्ये होणा-या एशिया कपसाठी भारतीय संघाच्या कॅम्पमध्ये निवड झाली. इंडिया कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर ट्रायल आणि त्यानंतर भारतीय संघासाठी निवड होणार आहे. सायकल फेडरेशन ऑफ इंडियाचे मुख्य प्रशिक्षक सिंग यांनी ही निवड केली. पुढील आठवड्यात अंजली दिल्ली येथे प्रशिक्षण घेण्यासाठी जाणार आहे.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आणि तिची इंडिया कॅम्पमध्ये निवड झाली. हा अगदी कमी कालावधीतला पण अत्यंत खडतर मेहनतीचा हा प्रवास आहे. अंजली अशोक रानवडे सध्या चिंचवड येथील प्रतिभा कॉलेज येथे अकरावी विज्ञान शाखेत शिकत आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये हरियाणामधील कुरुक्षेत्र येथे सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे आयोजित रोड सायकलिंग नॅशनल चॅम्पियनशिप झाली. यामध्ये अंजलीने वैयक्तिक पातळीवर कांस्य पदक तर सांघिक पातळीवर सुवर्ण पदक मिळवले. पहिल्या स्पर्धेत अशी दमदार कामगिरी करत तिने तिच्या कौशल्यपूर्ण सायकलिंगची सर्वांवर छाप उमटवली. वैयक्तिक पातळीवरील स्पर्धेत तिने 10 किलोमीटर अंतर केवळ 10 मिनिटे 30 सेकंदात पूर्ण केले.

  • बालवाडीतील स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई
    त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे जयपूर येथे आयोजित केलेल्या ट्रॅक सायकलिंग नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये अंजलीने सांघिक पातळीवर कांस्य पदक मिळवले. 9 फेब्रुवारी 2019 रोजी हिंजवडी येथे स्कूल नॅशनल रोड सायकलिंग ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत वैयक्तिक सायकलिंग प्रकारात अंजलीने सहभाग घेतला. त्यात तिने 12 किलोमीटरचे अंतर केवळ 19.15 मिनिटात पूर्ण करून सुवर्ण पदक पटकावले. त्यानंतर लगेच तीन दिवसांनी बालेवाडी येथे स्कूल नॅशनल ट्रॅक सायकलिंग स्पर्धा झाल्या. त्यातही तिने 2 किलोमीटरचे अंतर केवळ 3.2 मिनिटात पूर्ण करून पुन्हा एकदा सुवर्ण पदकाची कमाई केली.

जयपूर येथे झालेल्या स्पर्धेत तिची इंडिया कॅम्प मध्ये निवड करण्यात आली आहे. यापूर्वी अंजली केवळ छंद म्हणून सायकलिंग करत असे. तसेच तिला मर्दानी खेळांची देखील आवड आहे. अंजलीला आदित्य आणि वैष्णव हे दोन लहान भाऊ आहेत. आदित्य सातवी तर वैष्णव चौथीच्या वर्गात शिकत आहेत. ते दोघेही लॉन टेनिस खेळत आहेत. तिघेही भावंडे खेळामध्ये निपुण आहेत. अंजली सध्या बालेवाडी येथे सराव करित आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3