Pimpri-Chichwad : भक्तिमय वातावरणात ‘गणपती बाप्पा’ला निरोप (क्षणचित्रे)

एमपीसी न्यूज – पिंपरी परिसरातील दहा दिवसांच्या ‘गणपती बाप्पा’ला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात गणपती विसर्जन करण्यात आले. भव्य मिरवणुका, आकर्षक सजावट आणि ढोल ताशांच्या पथकांसह गणपती बाप्पा गावाला गेले. दरम्यान विविध सामाजिक संघटना आणि संस्थांच्या वतीने पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले. यंदा मिरवणुकांमध्ये गुलाल ऐवजी भंडारा उधळून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

….ढोल-ताशांचा दणदणाट…आकर्षक विद्युत रोषणाई… फुलांनी सजवलेल्या रथांची रेलचेल…लक्षवेधक चित्ररथ… गणपती बाप्पा मोरयाचा अखंड जयघोष.. एक दोन तीन चार, गणपतीचा जय जयकार”, ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…. पुढच्या वर्षी लवकर या’… गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला…..अशा जयघोषात फुलांची मनसोक्त उधळण करत उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात वरूनराज्याच्या जलाभिषेकात लाडक्या गणरायाला चिंचवडकरांनी गुरुवारी (दि.12) निरोप दिला. बारा वाजेपर्यंत 36 मंडळे विसर्जन घाटाकडे रवाना झाली होती. तब्बल दहा तास चाललेली विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.

(सर्व छायाचित्रे : अमोल वाजगे)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.