Pimpri: चॉकलेटच्या बहाण्याने बोलावून घेऊन ज्येष्ठाकडून बालिकेचा अत्याचार

एमपीसी न्यूज – चॉकलेट देण्याच्या बहाण्याने दुकानात बोलावून घेऊन ज्येष्ठ नागरिकाने एका पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना शुक्रवारी (दि. ६) दुपारी अडीचच्या सुमारास नेहरुनगर, पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी भाऊराव ऊर्फ आप्पा बळीराम खरात (वय 67, रा. अण्णासाहेब मगर स्टेडिअमसमोर, नेहरूनगर, पिंपरी) आरोपीला अटक केली आहे. याबाबत 53 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शुक्रवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आरोपी खरात याने फिर्यादी यांच्या पाच वर्षीय नातीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याच्या किराणा मालाच्या दुकानात बोलविले. त्यानंतर दुकानात बालिकेवर लैंगिक अत्याचार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी ठाण्याचे फौजदार एस. एस. जाधव तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.