BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : वंडरलॅड स्कूलमध्ये बालदिन साजरा

एमपीसी न्यूज- ओम प्रतिष्ठान संचलित वंडरलॅड स्कूलमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संगीत खुर्ची, पेपर बॉल बॅलंसिंग, झिगझ्याग रनिंग असे खेळ खेळून बालचमूने मनसोक्त आनंद लुटला. त्याला पालकांची देखील साथ मिळाली.

नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. बाल चिमुकल्याचा उत्साह अवर्णनीय होता. कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या खेळाचे आयोजन केले होते. संगीत खुर्ची, पेपर बॉल बॅलंसिंग, झिगझ्याग रनिंग असे खेळ खेळून बालचमूने मनसोक्त आनंद लुटला. मुलांसोबत त्यांच्या पालकांनीही कार्यक्रमात भाग घेऊन आपला आनंद व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता पाटील यांनी केले. वनिता सावंत यांनी आभार मानले. वंडरलॅडच्या सर्व टीमने मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम यशस्वी केला.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3