Pimpri News : महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बदनामी विरोधातील बंदमध्ये कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे सहभागी होणार

एमपीसी न्यूज :  महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बदनामी विरोधात विविध राजकीय पक्ष व संघटना यांनी उद्या 8 डिसेंबर रोजी पिंपरी-चिंचवड बंदची घोषणा केली आहे.(Pimpri News) या बंदमध्ये कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे सहभागी होणार आहेत. 

महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बदनामी विरोधात विविध राजकीय पक्ष व संघटना यांनी उद्या 8 डिसेंबर 2022 रोजी पिंपरी चिंचवड शहर बंद पुकारला आहे. या बंदमध्ये कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे दुपारी 12 वा पिंपरी येथे सहभागी होणार असल्याची माहिती बहुजन महापुरुष सन्मान समितीचे समन्व्यक यांनी आज दिली आहे. बहुजन महापुरुष सन्मान समिती च्या नेतृत्वाखाली हा बंद होणार आहे.

 

समितीच्या प्रमुख मागण्या

1) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची तातडीने राज्यपाल पदावरून हाकालपट्टी करण्यात यावी.

2) भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी देशातील जनतेची माफी मागावी.

3) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करून जनतेची माफी मागावी.

 

सहभागी राजकीय पक्ष व सामाजिक संघटना 

या बंद मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी, एमआयएम, आम आदमी पार्टी या सारखे राजकीय पक्ष सहभागी असतील. तसेच 100 हून अधिक विविध पुरोगामी सामाजिक संघटना जसे संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, छावा संघटना, मराठा क्रांती मोर्चा, प्रहार व इतर संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे. शहरातील औद्योगिक संघटना देखील बंद मध्ये सहभागी होणार आहेत. तसेच सर्व मुस्लिम संघटना या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. हे सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटना 8 डिसेंबर रोजीच्या शहर बंद मध्ये सहभागी असतील.

PCMC News : आत्मनिर्भर स्वनिधी योजनेअंतर्गत फेरीवाल्यांनी अर्ज भरावेत, पालिकेचे आवाहन

हा बंद सकाळी 7:00 ते सायंकाळी 5:00 वा पर्यंत असेल. यामध्ये पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत असेल. (Pimpri News) प्रत्येक संघटना/ नागरिकांचा समूह आपल्या आपल्या भागातून रॅली काढुन पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जमणार आहेत. या बंद मधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. यामध्ये दूध, भाजीपाला, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेस, रिक्षा, औषध दुकाने, घरगुती गॅस सिलेंडर वितरण, पेट्रोल पंप व इतर सेवांचा समावेश आहे.

समितीचे समन्व्यक मानव कांबळे म्हणाले की, सर्व सहभागी पुरोगामी राजकीय पक्ष व सामाजिक संघटना शांततेत विरोध करतील. या बंद मध्ये सहभागी होण्यासाठी कुणावरही जबरदस्ती करण्यात येणार नसल्याचही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.