Pimpri Chinchwad : शहरात ‘लाल बाल पाल’ यांचे समूह शिल्प उभारावे

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्य चळवळीत ‘महोदय, लाल-बाल-पाल’ या तीन(Pimpri Chinchwad) उयेष्ठ व थोर स्वातंत्र्यविरांचे स्मारक किंवा शिल्प पिंपरी चिंचवड शहरात उभारावे अशी मागणी अपना वैश्य समाज संस्थेचे अध्यक्ष सुधीरकुमार अग्रवाल यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदानात म्हटले आहे की, स्वातंत्र्य काळात लाल लाजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या तीन जहालवादी नेत्याच्या नावांवर देशाचा इतिहास स्वर्ण अक्षरात नोंदविला गेला आहे..

तत्कालीन ब्रिटिश प्रशासन व्यवस्थेला जाब विचारत आपल्या जहाल विचारांनी या तिघांनी इंग्रजाविरुद्ध युद्ध पुकारून क्रांतीची बीजे जनमनात पेरण्याचे मोठे काम केले होते. या तीन्ही स्वातंत्र्यसंग्रामींची एकत्रित विचारधारा पाहून त्यांना ‘लाल-बाल-पाल’ या त्रिसुत्री नावाने देशभरात ओळखले जाऊ लागले.

Pune : महिला आयोगाकडे येतात पुरुषांच्याही तक्रारी – रूपाली चाकणकर

नव्या पिढीला या तिन्ही पराक्रमी स्वातंत्र्यवीरांचे (Pimpri Chinchwad) स्मरण सदैव राहावे व आजादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून त्यांचे समूह शिल्प आपल्या पिंपरी-चिंचवड शहरात उभारले जावे .

पिंपरी चिंचवड महापालिकेची शंभरहून अधिक उद्याने शहरात असून यापैकी एखाद्या उद्यानात देखील हे स्फूर्तीदायी शिल्प आकाराला येऊ शकते. मागणीचा योग्य विचार करून स्वातंत्र्याच्या सध्या सुरू असलेल्या ‘अमृत महोत्सवी’ वर्षामध्ये हा प्रकल्प आकाराला यावा अशी मागणी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.