_MPC_DIR_MPU_III

Pimpri : पिंपरी चिंचवड अंतरंगच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – सातव्या पिंपरी चिंचवड अंतरंगच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ शिल्पकार व क्रिकेटपटू चंद्रशेखर जोशी आणि ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ मनोहर पारळकर यांच्या हस्ते आज(सोमवार, ५ नोव्हेंबर) एका छोटेखानी समारंभात करण्यात आले. 
_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II
यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, केंद्र सरकारच्या जीएसटी विभागाचे अधिकारी विजय वर्मा, पिंपरी चिंचवड अंतरंगचे संपादक विवेक इनामदार, सहयोगी संपादक अनिल कातळे, कार्यकारी संपादक हृषीकेश तपशाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यंदाच्या पिंपरी चिंचवड अंतरंगच्या मुखपृष्ठावर एक अनोखे काष्ठशिल्प झळकत आहे. वय वर्ष अवघे सत्याऐंशी असलेल्या एका बुजूर्ग शिल्पकाराने एकाच लाकडाच्या ओंडक्यातून घडवलेले हे शिल्प निश्चितच लक्षवेधक आहे. शिल्पकार व रणजीपटू असलेले चंद्रशेखर जोशी चिंचवडचे रहिवासी आहेत. त्यांची विस्तृत मुलाखत यंदाच्या अंकात वाचकांना वाचायला मिळणार आहे. तसेच पिंपरी चिंचवडची निवड स्मार्ट सिटीमध्ये झाली आहे. सर्वात श्रीमंत महापालिका ते स्मार्ट सिटी ही वाटचाल कशी असणार आहे याचा आढावा घेणारा लेख या अंकात आहे. एकविसाव्या शतकात आल्यानंतर आता आपण स्मार्ट होण्याबरोबरच प्रगत देखील होत आहोत. बहुचर्चित मेट्रो थोड्या कालावधीनंतर पुणे व पिंपरी चिंचवडमधून धावणार आहे. या मेट्रोच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडणारा लेख या अंकात समाविष्ट आहे. विशेष उल्लेख करावा असे म्हणजे ज्येष्ठ कवी व  वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांची सध्याच्या मी टू या विषयावर एक कविता या अंकात आहे. तसेच दिवंगत कवी नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे यांचा एक वैचारिक लेख देखील आहे. त्याचबरोबर कथा, कविता, बालसाहित्य, राशीभविष्य यांनी हा अंक नटलेला आहे.
_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.