Pimpri News : पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशन तर्फे पिंपरी न्यायालयात संविधान दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशन तर्फे मोरवाडी, पिंपरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमानिमित्त सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲड. अरविंद सुधाकरराव आव्हाड यांचे संविधानावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी मोरवाडी, पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश डी.आर. पठाण साहेब, तसेच न्यायाधीश वानखडे साहेब न्यायाधीश काळे साहेब, न्यायाधीश फटाले साहेब, न्यायाधीश भोसले साहेब, पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.सचिन थोपटे, सचिव ॲड.निखिल बोडके उपस्थित होते.

तसेच महिला सचिव ॲड.प्रियांका सुरवसे, सहसचिव ॲड.सुनील रानवडे, खजिनदार ॲड.अनिल पवार, ऑडीटर ॲड.गोरख मकासरे, सदस्य ॲड.मंगेश खराबे, ॲड.महेश मासुळकर, ॲड.सारिका मोरे, ॲड.संतोषी काळभोर, ॲड.स्नेहा कांबळे, ॲड.ऐश्वर्या शिरसाट, पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड.संजय दातीर पाटील, ॲड. दिनकर बारणे, ॲड. सूनील कडुसकर, पिंपरी-चिंचवड खेड मावळ नोटरी संघटनेचे अध्यक्ष ॲड. आतिश लांडगे,ॲड.जे.के.काळभोर, ॲड.संगिता परब, ॲड.सुजाता बिडकर, ॲड.रूपाली वाघेरे, ॲड.मुकुंद ओव्हाळ यांच्यासह न्यायालयातील बहुसंख्य वकील कार्यक्रमाकरिता उपस्थित होते.

ॲड. हेमंत रमाणे यांची कन्या अनुश्री यांनी यावेळी स्वागत गीत सादर केले तसेच ॲड.मंगेश खराबे व ॲड.प्रियांका सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. अखेर ॲड.निखिल बोडके यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.