Pimpri : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘बंद’ शांततेत ; 100 टक्के प्रतिसाद

पिंपरीत सात तास धरणे आंदोलन

437

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला पिंपरी, चिंचवड, भोसरी शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. आंदोलनाला सर्वच राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. शहरभर आंदोलन शांततेत पार पडले. पिंपरी चौकात सकाळपासून धरणे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जुना पुणे-मुंबई महामार्गावरील सर्व्हिस रोडची वाहतूक बंद ठेवली होती.

HB_POST_INPOST_R_A

पिंपरी, कॅम्प, चिंचवड, भोसरी, एमआयडीसी, दिघी, निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, पिंपळेसौदागर, पिंपळे निलख, सांगवी, रावेत, वाकड, हिंजवडी परिसरात सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला.

आज शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद होती. व्यावसायिकांनी स्वतःहून दुकाने, हॉटेल बंद ठेवली होती. पीएमपीएमपीएमलच्या बस बंद ठेवण्यात आल्या होत्या. रिक्षा देखील बंद होते. सकाळपासून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती. सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते भगवे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने शहराच्या विविध भागातून रॅली काढत होते. रॅलीची सांगता पिंपरीत केली जात होती. रॅलीतील कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी होत होते. सायंकाळी पाचच्या सुमारास धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.

बंदसाठी पिंपरी चौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: