Pimpri Chinchwad : पुणे यार्ड रीमॉडेलिंग दरम्यान चिंचवड स्टेशनवर गाड्या थांबवण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज : पुणे यार्डच्या रीमॉडेलिंगचे काम येत्या काही दिवसांत सुरू (Pimpri Chinchwad) होणार असून ते पूर्ण होण्यासाठी सुमारे एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधी लागण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, रेल्वे प्रवासी संघ पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी आणि विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती सदस्य बशीर सुतार यांनी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाला चिंचवड स्थानकावर थांबा देण्याची विनंती केली आहे.

एप्रिल ते जुलै या सुट्टीच्या कालावधीत नागरिकांच्या प्रवासात लक्षणीय वाढ होते. यामुळे पुणे स्थानकावर वाहतुकीचा ताण वाढतो, त्यामुळे पुणे आणि लोणावळा दरम्यान चिंचवड मध्यवर्ती स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देऊन लोड कमी करणे आवश्यक होते.

या कारवाईमुळे महापालिका हद्दीतील आणि देहू रोड आणि तळेगाव (Pimpri Chinchwad) येथील लाखो प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचेल आणि प्रवास अधिक आरामदायी होईल.

Pune News : शिंदे फडणवीस सरकार फार काळ तग धरू शकणार नाही -दिलीप वळसे पाटील

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.