Pimpri Chinchwad : राजस्थानमधून आणून मुकाईनगर येथे पॉपी स्ट्रॉ विक्री करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – राजस्थान येथील (Pimpri Chinchwad) साथीदाराकडून पॉपी स्ट्रॉ हा अंमली पदार्थ मागवून पिंपरी-चिंचवड शहरात विकणाऱ्या व्यक्तीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 1) दुपारी मुकाईनगर येथे करण्यात आली.

गोपाळ कृष्णराम खिलेरी (वय 40, रा. मुकाईनगर, हिंजवडी. मूळ रा. जोधपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह साथीदार दिनेश बिष्णोई याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई सदानंद रुद्राक्षे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Maval : मावळ वारकरी सेवा समितीच्या वतीने वारकऱ्यांचा सन्मान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने राजस्थान येथून (Pimpri Chinchwad) पॉपी स्ट्रॉ (अफू वनस्पतीच्या सुकवलेल्या बोंडांचा चुरा) पिंपरी चिंचवड शहरात विक्रीसाठी आणला. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली असता पोलिसांनी गुरुवारी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास आरोपी गोपाळ याच्या घराजवळ सापळा लावून कारवाई केली. त्यावेळी आरोपी त्याच्या दुचाकीवरून पॉपी स्ट्रॉ विक्रीसाठी जात होता.

पोलिसांनी 331 ग्रॅम पॉपी स्ट्रॉ, अफिम, मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण 77 हजार 965 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोपाळ याने हा पॉपी स्ट्रॉ दिनेश बिष्णोई यांच्याकडून आणला असल्याचे पोलीस तपासात समोर आले असल्याने दिनेश विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.