Pimpri Chinchwad : गावठी पिस्टल व धारदार शस्त्रासह तीन सराईत गुन्हेगारांना अटक

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड अंमली पदार्थ विरोधी (Pimpri Chinchwad) पथकाने मोठी कारवाई करत तीन सराईत गुन्हेगारांना गावठी पिस्टलसोबत अटक केली आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडून 1 लाख 11 हजार रुपये किंमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 1 फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडली. 

सविस्तर माहिती अशी, की 1 फेब्रुवारी रोजी पोलीस आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिस हवालदार संदीप पाटील आणि पोलिस शिपाई अशोक गारगोटे यांना आरोपींची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसानी 3 सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 50 हजार 700 रुपये किंमतीचे 1 गावठी पिस्टल त्यासोबत 1 जिवंत राऊंड व 1 खाली पुंगळी, 300 रुपयांचा लोखंडी धारदार कोयता, हिरो कंपनीची 50,000 रुपयांची बाइक, 10 हजारांचा वन प्लस मोबाईल असा एकूण 1 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Maharashtra MLC Election Result : विधानपरिषदेचा पहिला निकाल हाती, कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

या प्रकरणी पोलिसांनी निलेश भगवान तारू (वय 32 वर्ष, रा. नंददीप कॉलनी, काळेवाडी), अक्षय प्रकाश मानकर (वय 22 वर्ष, रा. विठ्ठल रुक्माई मंदिर शेजारी, उत्तम नगर), वैभव सुरेश मानकर (वय 30 वर्ष, सध्या रा. दांगट नगर, शिवणे) या तिघांना अटक केली असून आरोपी हितेश सुरेश मानकर (वय 22 वर्ष, रा.दांगट नगर शिवणे) याच्या शोधात आहेत.

आरोपीनी अवैधरित्या, विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर वाकड पोलीस (Pimpri Chinchwad) स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3(25), 4(25) व महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे 37(1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.