Pimpri: चिंचवड, भोसरी भाजपच्या ताब्यात तर, पिंपरी राष्ट्रवादीकडे; शिवसेनेचे नुकसान

एमपीसी न्यूज – चिंचवड आणि भोसरी मतदारसंघ भाजपने ताब्यात ठेवले आहेत. चिंचवडमधून लक्ष्मण जगताप यांनी तर महेश लांडगे यांनी ‘कमळ’च्या चिन्हावर भोसरीतून विजय मिळविला. पिंपरीतून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी जोरदार कमबँक केले आहे. त्यामुळे शहरात राष्ट्रवादीचा एक आमदार झाला आहे. तर, शिवसेनेचा उमेदवाराचा पराभव झाला असून शिवसेनेचा आता शहरात एकही आमदार नाही.

पिंपरी विधानसभा मतदारसंघ युतीत शिवसेना सुटला. शिवसेनेकडून विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, चाबुकस्वार यांचा राष्ट्रवादीचे बनसोडे यांच्याकडून 19 हजाराच्या मताधिक्याने पराभव सहन करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे बनसोडे यांनी पिंपरीत पुन्हा कॅमबक केले आहे. शहरातील तीनही मतदारसंघापैकी केवळ पिंपरीत राष्ट्रवादीचे चिन्ह होते. त्याचा राष्ट्रवादीला फायदा झाला असून शहरात राष्ट्रवादीचा आमदार झाला आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे लक्ष्मण जगताप सलग तिस-यावेळी निवडून आले आहेत. एकदा अपक्ष आणि दोनदा कमळाच्या चिन्हावर अशी तीनवेळा निवडून येत हॅटट्रिक केली आहे. जगताप यांचा 38 हजार 498 मतांनी विजय झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबा घेऊन अपक्ष निवडणूक रिंगणात उतरलल्या राहुल कलाटे यांनी एक लाख 12 हजार 225 मते घेतली.

भोसरीतील सलग दोनवेळा अपक्ष निवडून येण्याचा इतिहास मोडत महेश लांडगे यांनी कमळाच्या चिन्हावर बाजी मारली आहे. तब्बस 77 हजार 577 मताधिक्य घेऊन लांडगे विजयी झाले आहेत. मागील निवडणुकीत लांडगे अपक्ष निवडून आले होते. माजी आमदार विलास लांडे यांना सलग दुस-यावेळी दारुण पराभव सहन करावा लागला. त्यांनी राष्ट्रवादीचे तिकीट नाकारत लांडे यांनी अपक्ष लढणे पसंत केले. परंतु, त्यांचा सलग दुस-यावेळीही पराभव झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.