Pimpri : पिंपरी-चिंचवड भाजपा पक्ष कार्यालयात संविधान दिन साजरा

एमपीसी न्यूज- भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ अध्यक्ष अमित गोरखे यांच्या पुढाकारातून भाजपा शहर पक्ष कार्यालय मोरवाडी पिंपरी येथे भारतीय संविधान दिन मोठ्या आनंदाने साजरा
करण्यात आला आहे.

यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ अध्यक्ष अमित गोरखे, उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक माऊली थोरात, बाबू नायर, अनुराधा गोरखे, राजू दुर्गे, राजेश पिल्ले, जयश्रीताई वाघमारे, शैलाताई मोळक, सरचिटणीस
रविजी केळकर, अनुसूचित जाती अध्यक्ष मनोज तोरडमल, कोमल शिंदे, दीपक चखाले, सागर, राजू आवळे, वैशाली खडये,  संजिवनी पांडेय, कोमल काळभोर, आशा गायकवाड, पुष्पा वायदंडे, अविंदा झेंडे, शालू महापुरे, सुमन आवळे उपस्थित
होते.

या निमित्ताने बोलताना अमित गोरखे म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताने सर्वश्रेष्ठ संविधानाची  २६ नोव्हेंबर १९५० रोजी घटना समितीने स्वीकारले. भारतीय इतिहासातील २६ नोव्हेंबर हा दिवस’ संविधान दिन’ साजरा केला जातो, भारताचे संविधान किंवा राज्य घटना हे भारत देशाचे संविधान हे पायाभूत कायदा आहे. भारतीय संविधान हे
सर्वश्रेष्ठ आहे. संविधानातील तत्वे आपणा सर्वांसाठी आदर्श आहेत. याचे पालन प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोमल शिंदे यांनी केले. तसेच उपमहापौर तुषार हिंगे, माऊली थोरात, मनोज तोरडमल, राजेश पिल्ले यांनी मनोगत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.