Pimpri News : हिमाचल प्रदेशातील विजयानिमित्त शहर काँग्रेसकडून जल्लोष

एमपीसी न्यूज –  हिमाचल प्रदेश मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या विजयानिमित्त पिंपरी- चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (Pimpri News) वतीने आज (गुरुवारी) आनंद उत्सव साजरा केला. काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून ढोल ताशे वाजवत, फटाक्यांची आतिषबाजी करत, मिठाई वाटत, काँग्रेस विजयाच्या घोषणा देत जल्लोष केला.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमसृष्टी चौकात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. हिमाचल प्रदेश मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 68 पैकी 40 जागांवर विजय मिळत स्पष्ट बहुमत मिळाले. हा विजय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि हिमाचल प्रदेश मधील नागरिकांचा व काँग्रेस विचाराचा विजय असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर हिमाचल प्रदेश मधील नागरिकांनी महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, दडपशाही, पिळवणूक, अत्याचार, भ्रष्टाचार व एकाधिकारशाही या सर्वांविरुद्ध हा कौल दिल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले.

PCMC News : परवानगीविना अधिकारी जाताहेत प्रशिक्षण, उच्चशिक्षणासाठी, यापुढे…

शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला अध्यक्षा सायली नढे,  सेवा दलाचे अध्यक्ष वीरेंद्र  गायकवाड,  पिंपरी विधानसभा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड विधानसभा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माऊली मलशेट्टी, पिंपरी-चिंचवड अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष विजय ओव्हाळ, (Pimpri News) स्वाती शिंदे, छायावती देसले, आशाताई भोसले, हिराचंद जाधव, विजय इंगळे, अभिमन्यू दहीतुले, अर्जुन लांडगे, लक्ष्मण वावरे, जुबेर खान, मिलिंद फडतरे, पांडुरंग जगताप, सुधाकर कुंभार, उमेश बनसोडे, दीपक भंडारी, सचिन कदम आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.