Pimpri News: ‘ओबीसीं’साठी काम करणा-या कार्यकर्त्यांनाच पालिका निवडणुकीत ‘ओबीसी’ आरक्षित जागेवर संधी – योगेश टिळेकर

पिंपरी-चिंचवड शहर ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी जाहीर

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चोच्या माध्यमातून आगामी काळात समाजाच्या हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेण्यात येईल. जे कार्यकर्ते ‘ओबीसीं’साठी काम करतील अशा कार्यकर्त्यांनाच आगामी महापालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षित जागेवर  संधी देणार असल्याचे भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर  यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या वतीने ओबीसी मोर्चाची जंबो कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे उपस्थित होते.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना यावेळी नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, ओबीसी मोर्चा प्रदेश युवती प्रमुख पुनम राऊत, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख विना सोनवलकर, माजी महापौर राहुल जाधव, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विजय फुगे, सरचिटणीस राजू दुर्गे, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव अनुप सूर्यवंशी, प्रदेश सहसंपर्क प्रमुख निखिल झगडे, पुणे शहर ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश पिंगळे, पुणे ग्रामीण ओबीसी मोर्चा अध्यक्ष सागर भूमकर, कोथरूड विधानसभा ओबीसी मोर्चा अध्यक्ष रमेश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ओबिसी मोर्चा नवनियुक्त कार्यकारिणी!
शहराध्यक्ष – ऋषीकेश (भाऊ) रासकर., सरचिटणीस – नेहूल कुदळे, कैलास सानप, योगेश आकुलकर, अनिल राऊत., उपाध्यक्ष – कांतीलाल भुमकर, शंकर लोंढे, योगेश वाणी, संतोष सुतार, सचिन तळेकर, सुनील लांडगे, सचिन जाधव., चिटणीस – राहुल तळेकर, प्रवीण बनकर, हरिभाऊ तांदळे, अमोल सहावे, जीवन घाटकर, हनुमंत घुगे., प्रसिद्धीप्रमुख – ललीत म्हसेकर., सदस्य – स्वप्नील पाटील.

ओबिसी युवा मोर्चा : अध्यक्ष – राजेश डोंगरे., सरचिटणीस – नितीन साळी, अभिषेक कर्पे, आकाश कळमकर., उपाध्यक्ष – निकेश रवींद्र सोनाळे, संदीप आहेर, सुशांत शेलार, विकास हाडके, सचिन मदने., चिटणीस- नफिस खान, हनुमंत दणाणे., सदस्य – तुषार वाघमारे,

ओबिसी महिला मोर्चा : सरचिटणीस – जयश्री देशमाने, किरण पाचपांडे, सोनाताई गडदे., उपाध्यक्ष – कल्पनाताई गुळवे, लता हिवळेकर, मीना सानप, मनिषा बोराटे, चिटणीस- शुभांगी मोहळकर, नीता गोरे., सदस्य- गीता खंडागळे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.