Pimpri: शहराला राहण्यायोग्य शहर करणार – महापौर जाधव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे समस्या देखील जास्त आहेत. या समस्यांवर मात करुन शहराला राहण्यायोग्य शहर नक्की करणार असा, विश्वास महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केला. तसेच शहरातील शाळांमध्ये वाहतूक व स्वच्छतेविषयी शिक्षण देण्याचे नियोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आर्मेनिया देशातील येरेव्हान शहरात 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान झालेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय महापौर परिषदेतून शहरात परतल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या परिषदेमध्ये जगातील रशिया, लंडन, फिलीपाईन्स, चीन, टांझानिया, स्पेन, बेल्जियम, बांग्लादेश, श्रीलंका अशा जवळपास 76 देशांचे महापौर उपस्थित होते.

भारतातून पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव यांना उपस्थित राहून आधुनिक शहर विकासाबाबत चर्चा करता आली. या परिषदेमध्ये स्वयंपूर्ण शहरे, पब्लिक ट्रान्सपोर्ट, नियोजनपूर्ण शहरांचा शाश्वत विकास, शहरांच्या विकासा संदर्भात कायदे व धोरणे या विषयी कार्यशाळा तसेच विविध तज्ञांची मार्गदर्शन आयोजित करण्यात आली होती. या सोबत येरव्हन शहरातील महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांना तसेच महानगरपालिकेत भेटी इ. आयोजन करण्यात आले होते.

महापौर जाधव म्हणाले, येरव्हन, आर्मेनिया येथे यांत्रिक पध्दतीने करण्यात येत असलेली साफसफाई, स्वच्छ पाणी पुरवठा योजना, व सार्वजनिक वाहतुक व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारची दिसून आली. तेथील नागरिक नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. विद्यार्थी दशेतच त्यांना वाहतुक व स्वच्छते विषयी शिक्षण दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम होत असतो. याचा विचार करता पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांमध्येही वाहतूक व स्वच्छते विषयी शिक्षण देण्याचे नियोजन केले जाणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उपस्थित असलेल्या विविध महापौरांबरोबर शहराच्या विकासाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच त्यांना पिंपरी-चिंचवड शहरात राबविलेले विविध प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी भेटीचे निमंत्रण देण्यात आले. या भेटीमधून आपल्या शहराच्या विकासाच्या दृष्टीने काही तांत्रिक तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी वैविध्यपूर्ण प्रकल्पा बद्दल मदत होऊ शकते, याबद्दलही चर्चा करण्यात आली.

येरव्हन, आर्मेनिया येथे राहत असलेले पिंपरी-चिंचवड मधील विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधता आला. त्याला प्रतिसाद देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांची भेट घेण्यात आली. त्यावेळी भारतातील विद्यार्थी भाराऊन गेले होते, असेही महापौर जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.