Pimpri Chinchwad Corona : शहरात आज 10 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad Corona) शहराच्या विविध भागातील 10 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या एकाला डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आजमितीला एकही रुग्ण महापालिका रुग्णालयात दाखल नाही.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 59 हजार 557 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 77 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. सर्वच रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. महापालिका रुग्णालयामध्ये एकही रुग्ण (Pimpri Chinchwad Corona)  दाखल नाही.

Pune News : उन्हाने लाही लाही ! पुण्याचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला,

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन एकही नाही. 56 मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. आज दिवसभरात 196 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 35 लाख 80 हजार 754 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.