Corona Update : शहरात कोरोनाचे 119 सक्रिय रुग्ण, रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात 119 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील केवळ 3 रुग्ण महापालिका रुग्णालयात दाखल आहे. उर्वरित रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.(Corona Update) रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत असली. तरी, लक्षणे अतिशय सौम्य आहेत. त्यामुळे घाबरुन जाण्याचे काही कारण नाही. पण, काळजी घ्यावी असे आवाहन महापालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले.

कोरोनाचा पहिला रुग्ण 10 मार्च 2020 रोजी सापडला होता. 10 मार्च 2023 रोजी त्याला तीन वर्ष पूर्ण झाले. शहरातून कोरोना हद्दपार झाला होता. त्यामुळे नागरिकांसह आरोग्य यंत्रणेने सुटेकचा श्वास सोडला होता. पण, गेलेला कोरोना परत येतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपसून कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. दिवसाला 50 पर्यंत रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Pune : सर्वाधिक पीक कर्जवाटप 4 हजार 130 कोटी कर्जवाटपाद्वारे मोडला गतवर्षीचा उच्चांक

20 मार्च रोजी 53, 21 मार्च 18, 22 मार्च 7, 23 मार्च 51, 24 मार्च 48, 25 मार्च 16, 26 मार्च 9 आणि 27 मार्च रोजी 53 रुग्ण आढळले. 20 मार्चपासून 27 मार्चपर्यंत 255 रुग्ण आढळले.(Corona Update) आजपर्यंत  त्यातील 136  जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत शहरात 119 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील  3 रुग्ण महापालिका रुग्णालयात दाखल आहेत. उर्वरित सर्व रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.