Corona : कोरोनाच्या रुग्णवाढीमुळे घाबरु, पॅनिक होऊ नका, यंत्रणा सज्ज –  आयुक्त सिंह

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या नवीन व्हेरीयंटचे रुग्ण  वाढत आहेत. पण, घाबरण्याचे काही कारण नाही. रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. (Corona) विविध व्याधी, वयोवृद्धांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. यंत्रणा सज्ज असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

आयुक्त सिंह म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून देशासह शहरात करोनाचे रूग्ण वाढत आहेत. सध्या शहरात कोरोनाचे 208 सक्रीय रूग्ण आहेत. यापैकी केवळ 4 रूग्ण पालिका रूग्णालयात उपचार घेत आहेत. इतर रूग्ण घरीच उपचार घेत आहेत. मात्र, कोरोनाबाबत केंद्र सरकारने उपाय योजना करण्यासंदर्भात पालिकेला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पालिकेच्या वायसीएमसह सर्व रूग्णालयात ऑक्‍सिजन बेड, व्हेटिलेटर बेड, आयसीयू बेड उपलब्ध ठेवले आहेत. सर्व यंत्रणा सज्ज आहे. सर्व डॉक्‍टरांचीही आढावा बैठक घेतली आहे.

Pune : मुद्रांक शुल्क आणि रेडी रेकनर दराबाबत’च्या निर्णयाचे क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे स्वागत

सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, शहरात 208 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील रुग्णालयात केवळ 4 दाखल आहेत. (C0rona) या व्हेरिएंटचे फास्ट स्प्रेडिंग होत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.