Pimpri Corona Update : सोमवारी शहरात एक नवीन रुग्ण; सहा जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (सोमवारी, दि. 4) दिवसभरात एक नवीन रुग्ण आढळला. तर 9 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोना बाधितांची आजवरची संख्या 3 लाख 59 हजार 249 एवढी झाली आहे. तर आजवर 3 लाख 55 हजार 248 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 624 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 72 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 70 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 2 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 147 लसीकरण केंद्रांवर 48 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 35 लाख 12 हजार 711 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.