Pimpri Corona Update : शहरात आज 45 नवीन रुग्णांची नोंद; 59 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 45 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (गुरुवारी) नोंद झाली. तर, (Pimpri Corona Update) कोरोनामुक्त झालेल्या 59 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 629 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.(Pimpri Corona Update) शहरातील 3 लाख 71 हजार 228 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 375 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 368 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Rupee Bank : रूपी बँकेला हायकोर्टाचा दिलासा, परवाना रद्द करण्याच्या निर्देशाला 17 ऑक्टोबरपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

तर, 7 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल आहेत.(Pimpri Corona Update) आज दिवसभरात 471 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 73 हजार 328 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.