Pimpri Corona Update : शहरात आज 106 नवीन रुग्णांची नोंद, 59 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Pimpri Corona Update) शहराच्या विविध भागातील 106 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 59 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे (Pimpri Corona Update) महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 60 हजार 873 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 615 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 600 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Ashadhi Wari 2022 : आषाढी वारीची ही वैभवशाली परंपरा निरंतर राहू दे – महेश लांडगे

तर, 15 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 1 हजार 880 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 36 लाख 37 हजार 838 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.