रविवार, सप्टेंबर 25, 2022

Pimpri Corona Update : शहरात आज नवीन 2 हजार 562 रुग्णांची नोंद, 994 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 2 हजार 562 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त  झालेल्या 994 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीबाहेरील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 528 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 94 हजार 823 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 12 हजार 525 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 12 हजार 168 रुग्ण गृहविलगीकरणात असून 347 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 101 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 496 आहेत. आज दिवसभरात 16 हजार 909 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 31 लाख 47 हजार 46 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

spot_img
Latest news
Related news