Pimpri Corona Update : रविवारी शहरात 2626 नवीन रुग्ण; 1535 जण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 16) दिवसभरात 2626 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 1535 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 99 हजार 994 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 81 हजार 119 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 530 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 15 हजार 76 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 14 हजार 509 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 567 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 147 लसीकरण केंद्रांवर 11 हजार 946 नागरिकांचे लसीकरण झाले असून आजवर शहरातील 31 लाख 67 हजार 671 जणांनी लस घेतली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.