Pimpri Corona Update : रविवारी शहरात 9 नवीन रुग्ण; 7 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 29) दिवसभरात 9 नवीन रुग्ण आढळले. तर 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात कोरोना बाधितांची आजवरची संख्या 3 लाख 59 हजार 752 एवढी झाली आहे. तर आजवर 3 लाख 55 हजार 800 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आतापर्यंत कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 624 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात 59 रुग्ण सक्रिय आहेत. या सर्व रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 19 आणि खासगी 147 लसीकरण केंद्रांवर 1 हजार 364 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 35 लाख 99 हजार 205 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.