Pimpri: कौतुकास्पद! कोरोनाच्या लढ्यासाठी महापालिकेचे कर्मचारी देणार एक दिवसाचे वेतन

अंदाजे दीड कोटी जमा होणार

एमपीसी न्यूज – कोरोना विरोधातील लढ्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कर्मचारी एक दिवसाचे वेतन देणार आहेत. तसेच सेवानिवृत्त कर्मचारी देखील एक दिवसाचे पेन्शन देणार आहेत. यातून सुमारे दीड कोटी जमा होणार आहेत. ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये एक दिवसाचे वेतन जमा करण्याबाबतचे पत्र कर्मचारी महासंघ, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी असोसिएशनने आयुक्तांना दिले आहे.

पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव तापकीर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र देण्यात आले आहे. ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये एक दिवसाचे वेतन जमा करण्याची विनंती केली आहे.

महापालिकेत सुमारे साडेसात हजार कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांची संख्या देखील मोठी आहे. या आपत्तीत कर्मचा-यांनी माणुसकी दाखवत एक दिवसाचे वेतन देऊ केले आहे. त्याची रक्कम अंदाचे दीड कोटीच्या आसपास जात आहे.

महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे म्हणाले, जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यावर उपाय आणि उपचार करण्यासाठी प्रचंड आर्थिक भार पडत आहे. राज्य सरकार, महापालिका स्तरावर त्याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत.

या सर्वांना मदत म्हणून सामाजिक बांधिलीकी जपत महापालिकेतील कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचारी देखील एक दिवसाच्या पेन्शची रक्कम देणार आहेत. दीड कोटीच्या आसपास रक्कम होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.