Pimpri Chinchwad Crime News : बेकायदेशीर दारूविक्री प्रकरणी सात जणांविरोधात गुन्हे

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर दारूविक्री प्रकरणी निगडी, हिंजवडी परिसरात प्रत्येकी एक, तर चाकण आणि तळेगाव परिसरात प्रत्येकी दोन ठिकाणी छापे मारून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. सहा ठिकाणच्या छाप्यात पोलिसांनी एक लाख 78 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निगडी पोलिसांनी ओटास्कीम निगडी येथे एका तरुणावर कारवाई करून त्याच्याकडून 208 रुपयांचे विदेशी दारू जप्त केली. कुलदीप साहेबराव शिंदे (वय 26, रा. ओटास्की, निगडी) असे कारवाई केलेल्या तरुणाचे नाव आहे.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

हिंजवडी पोलिसांनी बाबू राठोड (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात कारवाई केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 1 लाख 67 हजार 500 रुपये किमतीचे गावठी दारू बनविण्याचे रसायन जप्त केले आहे. ही कारवाई पारखी वस्ती, माणगाव येथे करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

चाकण पोलिसांनी चंद्रकांत बबन अहिलकर (वय 25, रा. माणिक चौक, चाकण) आणि योगेश सुभाष बडगुजर (रा. वाकी बुद्रुक, ता. खेड) या दोघांवर कारवाई केली. चंद्रकांत यांच्याकडून एक हजार 630 रुपयांच्या बिअरच्या बाटल्या तर योगशकडून एक हजार 352 रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली आहे. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी योगेश त्याच्याकडे असलेली दारू टाकून पळून गेला.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

पारधे (वय 33, रा. सिद्धार्थ नगर, तळेगाव दाभाडे) यांच्याकडून 720 रुपयांची गावठी हातभट्टीची दारू तळेगाव दाभाडे पोलिसांनी जप्त केली. तळेगाव पोलिसांनी आणखी दोघांवर कारवाई करून त्याच्याकडून 7 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

शक्तीलाल बहादूर थापा (वय 21), राकेश दिलीप घारेरा (दोघे रा. बेबडओव्हळ, ता. मावळ) अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.