Pimpri Chinchwad Crime News : भोसरी, दिघी, सांगवी मधून पाच दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज : भोसरी आणि दिघी परिसरातून दोन तर सांगवी परिसरातून तीन दुचाकी वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहेत. याबाबत शनिवारी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच भोसरी परिसरातून दोन कारचे सायलेन्सर काढून नेले आहेत.

भोसरी पोलीस ठाण्यात दत्तात्रय तुळशीराम फुले (वय 50, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी तर दिघी पोलीस ठाण्यात गजानन केरबाजी घोडके (वय 36, रा. आळंदी) यांनी फिर्याद दिली. फुले यांची 15 हजारांची तर घोडके यांची 20 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे.

_MPC_DIR_MPU_II

महेश रामचंद्र पोकळे यांनी त्यांची 50 हजारांची दुचाकी चोरीला गेल्याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलीस ठाण्यात आणखी दोन वाहन चोरीबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात नितीन राजकपूर खंडारे (वय 33, रा. जुनी सांगवी) आणि नवनाथ तुकाराम शिंदे (वय 35, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. खंडारे आणि शिंदे यांची प्रत्येकी 25 हजारांच्या दुचाकी चोरीला गेल्या आहेत.

भोसरी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरासमोर पार्क केलेल्या इको कारचे सायलेन्सर काढून नेल्याचे दोन प्रकार उघडकीस आले आहेत. त्यातील पहिल्या प्रकारात दामिनी तुषार सुरवाडकर (वय 37, रा. इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुरवाडकर यांच्या इको व्हॅनचा 12 हजार रुपये किमतीचा सायलेन्सर काढून नेला आहे. तर दुस-या प्रकरणात प्रवीण दत्तात्रय पिंगळे (वय 26, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंगळे यांच्या इको कारचा एक हजार रुपये किमतीचा सायलेन्सर अज्ञात चोरट्यांनी काढून चोरून नेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.