Chinchwad Crime News : पिंपरी-चिंचवडमध्ये सहा चोरीच्या घटनांत 12 लाख 30 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात चोरीच्या आणखी सहा घटना उघडकीस आल्या आहेत. चोरट्यांनी तब्बल 12 लाख 30 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. यामध्ये दागिने, रोख रक्कम, दोन दुचाकी, एक टेम्पो, पाण्याची मोटार आणि कन्स्ट्रक्शन साहित्याचा समावेश आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. 6) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

निखिल पोपट पारखी (वय 30, रा. चांदे फाटा, माण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी पारखी यांच्या घरी घरफोडी करून 80 हजारांची सोन्याची साखळी, एक हजारांचे चांदीचे पैंजण आणि दीड लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 6) मध्यरात्री एक ते पहाटे पाच वाजताच्या कालावधीत घडली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

नवनाथ यशवंत सुळ (वय 37, रा. आल्हाट वस्ती, हिंजवडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 15 हजारांची दुचाकी मंगळवारी (दि. 4) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास लक्ष्मीबाई बारणे गार्डन पाण्याच्या टाकीजवळ पार्क केली होती. अवघ्या 25 मिनिटात त्यांची दुचाकी चोरीला गेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

कार्तिक रामकृष्णा मिन्ना (वय 26, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 80 हजार रुपये किमतीची दुचाकी पिंपरी येथील डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल येथील हायटेक बिल्डिंगच्या खाली पार्क केली. तिथून त्यांची दुचाकी चोरीला गेली आहे. ही घटना सोमवारी (दि. 3) रात्री साडेसात ते साडेदहा वाजताच्या कालावधीत घडली.

अमोल तबाजी सातपुते (वय 26, रा. आंबेठाण रोड, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांचा आठ लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो सोमवारी (दि. 3) रात्री नऊ वाजता आंबेठाण रोड, चाकण येथील मयूर हॉटेलच्या मागे पार्क केला. तिथून अज्ञात चोरट्यांनी त्यांचा आयशर टेम्पो चोरून नेला. हा प्रकार मंगळवारी (दि. 4) सकाळी उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

महादेव सोपान जाधव (वय 50, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे बोल्हाईमळा येथे शेत आहे. त्यांच्या शेतातील विहिरीतून अज्ञात चोरट्यांनी 18 हजार रुपये किमतीची पाणी खेचण्याची जलपरी मशीन शेतातील विहिरीतून चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 6) सकाळी उघडकीस आली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

प्रशांत प्रकाश डोंगरे (वय 28, रा. अमृतवेल कॉलनी, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची रहाटणी येथे गणराज कॉलनी मध्ये बांधकाम साईट सुरु आहे. बुधवारी (दि. 5) रात्री सात ते गुरुवारी (दि. 6) सकाळी आठ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या बांधकाम साईटवरून 77 हजार रुपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरून नेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.