Pimpri Chinchwad Crime : पिंपरी-चिंचवडच्या कोयता गँगमधील तिघांना अटक, तर तिघे फरार

एमपीसी न्यूज – कोयत्याचा धाक दाखवून लूटमार (Pimpri Chinchwad Crime) करणाऱ्या कोयता गँगच्या मुसक्या आवळण्याचा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा दोनच्या तपासी पथकाने प्रयत्न केला आहे. यात त्यांनी तिघांना ताब्यात घतले आहे मात्र तिघे अद्यापही फरार आहेत.

परशुराम वामन घोलप (वय 18, रा. मोरेवस्ती, चिखली) याला आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हे प्रकार आणखी तिघांसमोर मिळून केले असल्याचे सांगितले. अन्य तिघांचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच दिवशी अडीच तासात तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोयता, तलवार अशा शस्त्रांचा धाक दाखवत तीन ठिकाणी लूटमार केल्याची घटना घडल्या. दरम्यान गुन्हे शाखा युनिट दोनने तिघांना ताब्यात घेतले आहे.

Chinchawad Bye-Election : वयोवृद्ध, दिव्यांग व्यक्तींना करता येणार टपाली मतदान; 10 हजार मतदार 80 वर्षांपुढील

याच मुलांनी तोडफोड करून दहशत निर्माण केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.सहा जणांनी दुचाकीवरून येऊन कुऱ्हाड, तलवार अशी शस्त्रे घेऊन एकापाठोपाठ तीन ठिकाणी दहशत माजवून (Pimpri Chinchwad Crime) लूटमार केली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट दोनने समांतर तपास सुरु केला.

तिन्ही घटनांमधील आरोपी एकच असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांना मिळाली. त्यानुसार तपास करत पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. तपासात तिन गुन्पहे उघडकीस आले त्यातील घटना पहिली 6 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता नेवाळे वस्ती, चिखली येथील रूपेश्वर सुपर मार्केट या दुकानात टोळक्याने शस्त्रांचा धाक दाखवून कॅश काउंटरच्या ड्रॉवर मधून पाच हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेली.

याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दुसरी घटना चिखली येथील घटनेनंतर त्या टोळक्याने रात्री सव्वा अकरा वाजता मासुळकर कॉलनी पिंपरी येथे हिटलर क्रॉस चायनीज हॉटेलमध्ये टोळक्याने कोयता, कुऱ्हाड, तलवार घेऊन कामगारांना शिवीगाळ, धमकी देत दहशत निर्माण केली. टोळक्याने हॉटेलच्या ड्रॉवर मधून दीड हजार रुपये जबरदस्तीने काढून नेले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तर तिसरी घटना पिंपरी येथील घटनेनंतर त्या टोळक्याने रात्री पावणे बारा वाजता एम्पायर इस्टेट, चिंचवड येथील बेल्जीयम वॉफल्स कंपनीच्या स्टोअरमध्ये तलवारी व हत्यारे घेऊन दहशत माजवत तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून नेले. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

पुढील तपास गुन्हे शाखा दोनचे तपासी पथक करत असून ही कारवाई गुन्हे शाखा दोनचे पोलीस निरीक्षक सतिष नांदुरकर व त्यांच्या पथकाने काली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.