Dahi handi: पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाच्या सरी झेलत गोविंदा पथकांकडून दही हंडी उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज: पावसाच्या सरी अंगावर झेलत गोविंदा पथकांनी पिंपरी-चिंचवड शहरात दही हंडी उत्साहाने साजरी केली.( Dahi handi) तितक्याच उत्साहाने दही हंडी पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.

 

गेली दोन वर्षे कोरोना महामारी मुळे केंद्र व राज्य सरकारच्या विविध प्रतिबंधानमुळे दही हंडी सण सार्वजनिक ठिकाणी साजरा करण्यात आला नव्हता. या वर्षी कुठलेही निर्बंध नसल्यामुळे गोविंदा पथकांचा तसेच प्रेक्षकांचा प्रचंड उत्साह संपुर्ण शहरात दही हंडी उत्सव कार्यक्रमात जाणवत होता. तसेच दहीहंडी उत्सवासाठी  अनेक मंडळानी कलाकारांना अमंत्रीत केले होते.

 

श्री वसंत नाना लोंढे प्रतिष्ठान आयोजित पिंपरी शहरातील पहिली महिला सार्वजनिक दहीहंडी उत्सव सर्वात लक्षवेधी ठरत आहे. हा दहीहंडी उत्सव भोसरी मधील आळंदी रोड जवळील संत तुकाराम नगर येथे होत आहे.जिजाऊंच्या लेकी यांनी शिवकालीन युद्ध कला प्रत्यक्षिक दाखविले.(Dahi handi) मुंबईहून खास 3 महिला गोविंदा पथके बोलावण्यात आली होती. बाल शिवराज महिला गोविंदा पथक, रणझुंजार महिला गोविंदा पथक शिवतेकडी  जोगेश्वरी पूर्व व गोपिका महिला पथक, माऊंट मेरी, वांद्रे पश्चिम या पथकांनी हजेरी लावली होती. येथील भव्य बक्षीस 5,55,555 रुपये आहे. अभिनेत्री अश्विनी महानगडे ह्या विशेष आकर्षण आहेत.

AAP Protest : मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने टाकलेल्या धाडीच्या निषेधार्थ आपचे आंदोलन

भाजप नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी अखिल चिंचवडगाव सार्वजनिक दहीहंडी उत्सव 2022 याचे आयोजन क्रांतीवीर चापेकर चौक, (Dahi handi)चिंचवडगाव येथे केले आहे. ह्या दहीहंडी उत्सवाचे हे 17 वे वर्ष आहे. येथील भव्य बक्षीस  5,55,555 रुपये आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावे यांनी या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.