Drug gang arrested: जांभे व सांगवडे येथे अफूची विक्री करणारी टोळी गजाआड

एमपीसी न्यूज : पुण्या पाठोपाठ पिंपरी-चिंचवडमध्येही पॉपी स्ट्रॉ (अफूचा चुरा) विक्री  करणाऱ्या राजस्थान येथील बिष्णोई टोळीचा पर्दाफाश झाला आहे.( Drug gang arrested) यामध्ये पोलिसांनी शस्त्र व 110 किलो अंमली पदार्थासह सात जणांना अटक केली आहे. हि कारवाई पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी गुन्हे शाखा यांनी  शुक्रवारी (दि.5) जांभे-सांगवडे गावामध्ये करण्यात आली.

जयप्रकाश साईराम खीचड (वय.24 रा. सांगवडे), महेशकुमार उर्फ श्याम बाखाराम बिष्णोई, विकास मोहनराम बिष्णोई,पप्पू उर्फ भगवान खमुराम बिष्णोई (रा. सांगवडे), सुरेशकुमार जगलामाराम सियाक बिष्णोई, महिपाल जगलामाराम सियाक बिष्णोई, विकास डाका बिष्णोई अय़ी आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण मुळचे राजस्थानचे असून सध्या सांगवडे गावात राहण्यास आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक हिंजवडी व वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घलत असताना (Drug Gang arrested)  सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महालेव पोलीस उपनिरीक्षक राजन महाडीक यांच्या पथकातील पोलीस अमंलदार प्रदिप शेलार व संदिप पाटील यांना बातमीदारामार्फत खबर मिळाली की जांभे व सांगवडे येथे एका गॅस एजन्सीच्या मागे एक इसम हा पॉपी स्ट्रॉ विक्रीसाठी घेऊन आला आहे.

 

Pavana Dam: पवना धरण परिसरात गेल्या 24 तासात 7 मिलिमीटर पाऊस, गेल्यावर्षीच्या तुलनेने पाणीसाठा 12.41 टक्के कमी

 

त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता भारत गॅस टेम्पोच्या सीटवर व मोकाशी हाईटस मधील रुमवर 18 लाख 59 हजार 495 रुपयांचा 110 किलो पॉपी स्ट्रॉ व अफीम, तसेच देशी बनावटीचे पिस्टल व तीन जिवंत काडतूस असा ऐवज मिळून आला.

 

जयप्रकाश, महेश कुमार व विकास हे तेथे विक्री करण्यासाठी आले होते तर इतर साथीदारांनी हा पॉपी स्ट्रॉ राजस्थानमधून मिळवून देण्यासाठी त्यांना सहकार्य केले होते. (Drug gang arrested) यावरून सर्व आरोपींवर शिरगाव पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. याचा पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक व शिरगाव पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.