Pimpri Chinchwad Ganpati Visarjan 2023 : पिंपरीमधील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील विसर्जन (Pimpri Chinchwad Ganpati Visarjan 2023) मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. नेहरूनगर, महेश नगर, संत तुकाराम नगर, मोरवाडी, मासुळकर कॉलनी, पिंपरी गाव तसेच परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पिंपरी मधील झुलेलाल घाट येथे विसर्जन करतात.

या मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- गोकुळ हॉटेल – शगुन चौक या मार्गे पिंपरी येथील घाटावर ह्या मिरवणुका जातात.

 

विसर्जन मिरवणूक

दुपारी 3.55 वाजता 5 स्टार मित्र मंडळ या मंडळाने विसर्जन केले. त्यांनतर पाच वाजता शिवशक्ती मित्र मंडळाने विसर्जन केले. सात वाजताच्या सुमारास गणेश मंडळांच्या मिरवणुकांना सुरुवात झाली आहे.


पिंपरी येथे स्वागत कमान

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून पिंपरी येथे स्वागत कमान उभारण्यात आली आहे. इथे पोलिसांकडून गणेश मंडळांचे स्वागत केले जात आहे.


मिरवणूक मार्गावर नागरिकांना खाद्यपदार्थांचे वाटप केले जात आहे.


शिवशक्ती तरुण मंडळाचे कराची चौकात आगमन


गणेश मूर्ती संकलन केंद्र –

झुलेलाल घाट येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले आहे.


 

दिवसभर घरगुती बाप्पाचे विसर्जन झाले. प्रशासनाकडून ठिकठिकाणी कृत्रिम विसर्जन हौदांची निर्मिती करण्यात आली होती. या ठिकाणी विसर्जित केलेल्या मूर्ती वाहून नेण्यासाठी तसेच निर्माल्य संकलनासाठी वाहनांची सोय करण्यात आली होती.

गणेश भक्तांनी कृत्रिम हौदावर विसर्जन करत बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

Ganpati Visarjan 2023 : इतिहासात पहिल्यांदाच दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ दुपारी विसर्जन मार्गावर मार्गस्थ

सायंकाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली (Pimpri Chinchwad Ganpati Visarjan 2023) आहे.

ढोल ताशा, झांज पथके तसेच डीजेच्या तालावर ही मिरवणूक काढली जात आहे. शगुन चौकाजवळ महापालिकेच्या वतीने स्वागत कमान उभारण्यात आली आहे. या ठिकाणी प्रत्येक मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पालिकेकडून सत्कार केला जात आहे.


घाटावर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. विसर्जनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.


शास्त्रीनगर येथील जय भारत तरुण मंडळाने कराची चौकात केली भंडा-याची उधळण …

महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची स्वागत कक्षास धावती भेट

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.