Pimpri : राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या कन्येमुळे महाराष्ट्राची कांस्यपदकावर मोहोर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडची कन्या (Pimpri) आणि अष्टपैलू कबड्डीपटू समृद्धी लांडगे हिने शेवटच्या क्षणी केलेल्या चढाईमध्ये क्रॉस लाईन करीत एक खेळाडू बाद केला आणि 14 वर्षांखालील शालेय मुलींचा महाराष्ट्र कबड्डी संघाने उत्तरप्रदेशवर 4 गुणांनी विजय मिळवला. या रोमहर्षक विजयामुळे महाराष्ट्राने कांस्यपदकावर मोहोर उमटवली.

राजम पेठ, आंध्रप्रदेश येथे झालेल्या 14 वर्षांखालील शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये मुलींच्या महाराष्ट्र संघाने उत्तरप्रदेश संघाचा 52/49 असा 4 गुणांनी पराभव करत कास्यपदक पटकावले. अत्यंत चुरशीचा झालेल्या सामन्यात पिंपरी-चिंचवडची अष्टपैलू कबड्डीपटू समृद्धी लांडगे हिने महाराष्ट्राच्या संघाकडे विजय खेचून आणला.

महाराष्ट्र संघातून पुण्याची अष्टपैलू खेळाडू समृद्धी लांडगे, निकिता जाधव, सेरेना मस्कर, यशश्री इंगोले यांनी केलेल्या यशस्वी चढाया केल्या. तसेच, आरती खांडेकर, भूमिका माने, मृदुला मोहिते यांनी केलेल्या पकडी उत्कृष्ट ठरल्या. त्यांना श्रेया कुबरे, प्रतीक्षा राठोड, सेजल काकडे, अनुष्का चव्हाण यांनी उत्कृष्ट साथ दिली.

Pune : नंदिनी कोठारकर यांना पीएचडी पदवी प्रदान

कांस्यपदकासाठी महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश संघामध्ये (Pimpri) अतितटीचा सामना झाला. शेवटचे काही सेकंद बाकी असताना 52/49 अशा 3 गुणांची आघाडी महाराष्ट्र संघाकडे होती. त्यावेळेस मैदानात महाराष्ट्र संघाचे समृद्धी लांडगे आणि आरती खांडेकर हे केवळ दोनच खेळाडू उरले होते. उत्तरप्रदेश संघ महाराष्ट्र संघाला लोन देऊन 53/52 अशी 1 गुणाची आघाडी करत सामना जिंकणार असे चित्र दिसत होते.

मात्र, चढाईसाठी महाराष्ट्र संघाकडून पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी संघाची अष्टपैलू खेळाडू समृद्धी लांडगे हिने राईड केली असता तिला क्रॉस लाईनवर तिला पकडण्या प्रयत्न प्रतिस्पधी उत्तरप्रदेश संघाच्या खेळाडुंनी केला. समृद्धीने क्रॉस लाईन करत1 गुणांची कमाई केली आणि महाराष्ट्रावर पडणारा लोन वाचवला आणि एक खेळाडू बाद करीत महाराष्ट्राकडे विजय खेचून आणला. 53/49 अशा फरकाने महाराष्ट्राच्या संघाने स्पर्धेत कांस्यपदक मिळविले आहे. तसेच, महाराष्ट्र संघाने उत्तर प्रदेश, नवोदय विद्यालय, केरळ आणि पंजाब या संघाचा पराभव करून राष्ट्रीय स्पर्धेत वर्चस्व राखले आहे. प्रशिक्षक भगवान सोनवणे, महेंद्र ढाके, श्रद्धा गंभीर यांनी मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.