Pimpri chinchwad Lockdown : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत 15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात 14 एप्रिल रोजी लागू केलेला लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवला आहे. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत देखील 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असून, यापूर्वी निर्गमित केलेले आदेश 15 मे सकाळी सात वाजेपर्यंत ‘जैसे थे’ राहणार आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत आज (शुक्रवारी, दि.30) सुधारित आदेश काढले आहेत. 14 एप्रिल रोजी लागू केलेल्या आदेशाची मुदत एक मे रोजी संपत आहे.

_MPC_DIR_MPU_II

मात्र, कोरोना संसर्गाची लाट अद्याप आटोक्यात आली नसल्याने लॉकडाऊन एक मे पासून पंधरा मे पर्यंत वाढविण्यात आला आहे.

14, 17, 20 आणि 22 एप्रिल रोजी निर्गमित केलेले आदेश व मार्गदर्शक सूचना 15 मे सकाळी सात वाजेपर्यंत लागू राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.