Pimpri-chinchwad : शेअर्स खरेदीच्या बहाण्याने नागरिकाची 35 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – शेअर्स खरेदीचा बहाणा करत एका 49 वर्षीय नागरिकाची  तब्बल  35 लाख रुपयांची फसवणूक (Pimpri-chinchwad)  केली आहे. हा सारा प्रकार नोव्हेंबर 2023 ते 28 फेब्रुवारी 2024 या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी  आदित्य तुकाराम रानभरे (वय 49 रा. निगडी प्राधिकरण) यांना एका व्हॉटसग्रुपवर सामावून  घेऊन तिथे त्यांना शेअर्स खरेदी बद्द्ल सांगितले जायचे. ग्रुप एडमिन ने फिर्यादी यांना पी.टी. एप्लिकेशन मध्ये जाऊन शेअर्स विकून पैसे काढून घेण्यास सांगितले. फिर्यादी यांनी ते पैसे काढले मात्र त्यांच्या खात्यात ती रक्कम दाखल झाली नाही. फिर्यादी यांनी ग्रुप एडमीनला फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही. या प्रकरणात फिर्यादी यांनी 35 लाख 40 हजार 310 रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते.  ती रक्कम परत न देता फिर्यादीची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.

Pimpri: गुंतवणूकीच्या बहाण्याने महिलेची  27 लाखांची फसवणूक

याप्रकरणी आदित्य तुकाराम रानभरे (वय 49 रा. निगडी प्राधिकारण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आदित्य पाटील, मनोज कुमार व इतर दोन यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच  निगडी पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही व्हॉटसग्रुप किंवा अन्य सोशल मिडिया साईटवरून आर्थिक व्यवहार करण्याची दक्षता बाळगावी असे आवाहन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.