Infinity Community Radio : इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 एफएम व एमपीसी न्यूज पोर्टल यांच्यात सामंजस्य करार

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरातील पहिले (Infinity Community Radio) कम्युनिटी रेडिओ स्टेशन असलेले इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 एफएम व पुणे शहरातील पहिले सिटी न्यूज पोर्टल असलेले एमपीसी न्यूज पोर्टल यांच्यात नुकताच सामंजस्य करार करार झाला. 

 

करारावर पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, एमपीसी न्यूजचे संचालक व मुख्य संपदक विवेक इनामदार, संचालक व कार्यकारी संपादक हृषिकेश तपशाळकर, इन्फिनिटी 90.4 एफएम च्या निर्मिची प्रमुख माधुरी ढमाले-कुलकर्णी, पीसीईटीचे डिजिटल मार्केटिंग हेड डॉ. केतन देसले आदी मान्यवर उपस्थित होते.

PCMC :  अतिक्रमणावर धडक कारवाई

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) या अग्रगण्य संस्थेच्या वतीने  ‘इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 एफएम’ हे शहरातील पहिले रेडिओ केंद्र चालविले जाते.(Infinity Community Radio) या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांचे प्रसारण करून जनजागृतीचे काम करण्यात येते. मनोरंजनाचे तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच त्यांचे थेट प्रसारण देखील केले जाते.

एमपीसी न्यूज प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील  mpcnews.in हे पहिले व अग्रगण्य सिटी न्यूज पोर्टल चालविण्यात येते. (Infinity Community Radio) पत्रकारांनी सुरू केलेले व चालवलेले  हे मीडिया हाऊस गेली 14 वर्षे निर्भीड, निष्पक्ष व विश्वासार्ह पत्रकारिता करीत आहे. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून प्रसारित होणारी माहिती, कार्यक्रमांचे पुनर्प्रसारण, पुनर्मुद्रण करणे तसेच संयुक्तपणे उपक्रम राबविण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला.

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.