Pimpri: महापौरपदी राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे; शनिवारी होणार शिक्कामोर्तब

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून भोसरीतील नगरसेवक राहुल जाधव तर उपमहापौर पदासाठी चिंचवड मतदार संघातील नगरसेवक सचिन चिंचवडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची निवड निश्चित असून शनिवारी (दि.4) होणा-या विशेष सर्वसाधारण सभेत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी मंगळवारी (दि.24) आपल्या पदाचे राजीनामे दिले होते.  त्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आज (मंगळवारी) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करायचे होते. यावेळेत सत्ताधारी भाजपकडून महापौरपदासाठी नगरसेवक राहुल जाधव तर उपमहापौर पदासाठी नगरसेवक सचिन चिंचवडे  यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे त्यांची निवड निश्चित झाली आहे.

शनिवारी (दि. 4 ऑगस्ट) रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत महापौर, उपमहापौरांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल. पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएलच्या संचालक नयना गुंडे  कामकाज पाहणार आहेत. 

….असे आहे महापालिकेतील पक्षीय बलाबल!

 भारतीय जनता पक्ष 77, राष्ट्रवादी काँग्रेस 36, शिवसेना 9, अपक्ष 5 आणि मनसे 1 असे 128 नगरसेवक आहेत. यापैकी अपक्ष पाच नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.