BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उर्दू शाळांच्या समस्या सोडविण्यात याव्यात

भाजप युवती अध्यक्षा तेजस्विनी कदम यांची प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उर्दू शाळांच्या समस्यांबाबतचे निवेदन शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्याकडे भाजपच्या युवती अध्यक्षा तेजस्विनी कदम यांनी दिले.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,  पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १४ उर्दू प्राथमिक शाळांमध्ये मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व उपशिक्षकांची ४५ पदे रिक्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या कार्यरत असलेल्या अनुभवी मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांती पदे भरुन उर्वरित सर्व रिक्त जागांवर शिक्षकांची त्वरीत प्रभावाने नेमणूक करणे आवश्यक आहे. नियमित शिक्षक भरती होईपर्यंत तात्पूरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने मानधनांवर शिक्षकांची भरती करणे आवश्यक आहे.  सर्वच उर्दू  प्राथमिक शाळांना पुरेसा वर्ग खोल्या, खेळाचे मैदान व इतर भौतिक सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.

उर्दू प्राथिमक शाळांमधील शिक्षणाचा दर्जा खूपच खालावला आहे. इयत्ता सातवी पास झालेल्या उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांला दुसरी व तिसरीचे पुस्तक वाचता येत नाही. स्वत:चेच पालकांचे नाव लिहिता येत नाही. शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीची बैठकच घेतली  जात नाही.  शिक्षण मंडळाचे अधिकारी, पदाधिकारी, पर्यवेक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सभासदांनी अचानक शाळांना भेट देऊन शाळांची तपासणी करणे आवश्यक आहे. कर्तव्यात कसूर करणा-या शिक्षक, मुख्याध्यापतांवर कार्यवाही करणे आवश्यक आहे.

HB_POST_END_FTR-A2

.