Nigdi : दुरुस्तीच्या कामासाठी निगडी स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी बंद

एमपीसी न्यूज – निगडी येथील स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी आज (गुरुवार)पासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आली असल्याचे, महापालिकेने पत्रकाद्वारे कळविले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘फ’  क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत निगडीतील स्मशानभूमीत विद्युतदाहिनी बसविण्यात आली आहे. त्या विद्युतदाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी आजपासून विद्युतदाहिनी बंद ठेवण्यात आलेली आहे.

दरम्यान, निगडीतील अमरधाम स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीस 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. या दाहिनीचे आयुष्य 10 वर्षाचेच होते. त्यामुळे ही विद्युतदाहिनी कधीही बंद होऊ शकते. त्यामुळे नवीन गॅस शवदाहिनी बसविण्याची मागणी वारंवार केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.