Pimpri News: कश्मीर फाईल्स चित्रपट मोफत दाखवणारे राष्ट्रध्वज 25 रुपयाला विकत आहेत- इम्रान शेख

.एमपीसी न्यूज : समाजात तेढ निर्माण करणारा कश्मीर फाईल चित्रपट मोफत दाखवणारे आज भारतीय राष्ट्रध्वज 25 रुपयाला विकत आहेत. याचे वाईट वाटते. (Pimpri News) चित्रपटाचे एक तिकीट चारशे ते पाचशे रुपयाचे होते, ते मोफत वाटले आणि आज आपला देशाची शान असलेला राष्ट्रध्वज 25 रुपयाला विकला जात असल्याची खंत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान शेख यांनी व्यक्त केली.

देशाच्या 75 व्या स्वतंत्रतादिनानिमित्त देशभरात जल्लोष पाहायला मिळत आहे. युवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांमध्ये व युवकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी.आपल्या पूर्वजांनी देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी दिलेल्या बलिदानांची आठवण व सन्मान युवकांच्या ह्रुदयात रहावा यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज बिरासाहेब रुपनार मेमोरियल हॉस्पिटल इंद्रायणीनगर येथे हॉस्पिटल स्टाफ व नागरीकांना ‘भारतीय राष्ट्रध्वज’ मोफत वाटण्यात आले.

युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील वेगवेगळ्या प्रभागात नागरीकांना तीन हजार राष्ट्रध्वज मोफत देण्यात आले.(Pimpri News) यावेळी बोलताना शेख म्हणाले, स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना  एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगावीशी वाटते की काही दिवसांपूर्वी जाती पातीत दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करणारा कश्मीर फाईल चित्रपट भारतात मोफत दाखवणारे राष्ट्रध्वज 25 रुपयाला विकत आहेत. याचे आम्हाला वाईट वाटते. विशेष म्हणजे या चित्रपटाचे एक तिकीट चारशे ते पाचशे रुपयाचे होते ते मोफत वाटले गेले आणि आज आपला देशाची शान असलेला राष्ट्रध्वज 25 रुपयाला विकला जात आहे.

PCMC News: सफाई कर्मचाऱ्यांना मिळाले हक्काचे घर; अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांचा पुढाकार

वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, पडता जी डी पी हे सर्व सोडून काही लोक मोबाईलचा डीपी बदलायला सांगत आहेत. राष्ट्रभक्ती ही आमच्या रक्तात असून कोणाच्याही आव्हानावरून आम्ही आमची राष्ट्रभक्ती सिद्ध करत नसून देशाच्या स्वतंत्रता लढ्यात ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली.(Pimpri News) सर्वधर्मसमभाव असा सुंदर लोकशाही असलेला भारत देश आम्हाला मिळवून दिला. त्यांची आठवण व सन्मान म्हणून हा 75 वा अमृत महोत्सवी स्वतंत्र दिन आम्ही सर्व युवक साजरा करत आहोत”. असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी बीरा साहेब रुपनार हॉस्पिटल मधील डॉ. दत्ता शेटे,डॉ. अक्षय म्हसे,डॉ शिवा हिवाळे,परिचारिका अनिता लीगाडे,निकिता जाधव, भगवान शेटे,मोहिनी वामन, प्रवीण पोकळे,गणेश गायकवाड व दवाखान्यातील स्टाफ व पेशंटचे नातेवाईक व नागरिक यांना राष्ट्रध्वज तिरंग्याचे मोफत वाटप करण्यात आले.(Pimpri News) राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्याध्यक्ष ज्योतीताई गोफने, संजीवनी पुराणिक, मेधा पळशीकर,युवा नेते राहुल पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष लवकुश  यादव,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दीपक गुप्ता, अनुज देशमुख,शहर सचिव मयूर खरात,रोहित खोत, अनिकेत गडप्पा,दिनेश गंगवले व मोठ्या संख्येने युवा पदाधिकारी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.