Pimpri Chinchwad News : टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन; पोलिसांकडून सोमवारी 101 जणांवर खटले

टाळेबंदीचे नियम नागरिकांनी पाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र, काही नागरिक या नियमांना पायदळी तुडवत आहेत.

एमपीसी न्यूज – टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सोमवारी (दि. 24) 101 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे खटले दाखल केले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी टाळेबंदीची घोषणा करण्यात आली आहे.

टाळेबंदीचे नियम नागरिकांनी पाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र, काही नागरिक या नियमांना पायदळी तुडवत आहेत.

सोमवारी (दि. 24) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –

एमआयडीसी भोसरी (23), भोसरी (8), पिंपरी (0), चिंचवड (8), निगडी (3), आळंदी (0), चाकण (1), दिघी (18), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (3), वाकड (7), हिंजवडी (3), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (5), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (22), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.