Pimpri: ‘गुरूपौर्णिमेनिमित्ताने गुरूदक्षिणा म्हणून शहराला कोरोनामुक्त करण्याचा निश्चय करूया, सर्वांनी मास्क वापरुया’

Pimpri-chinchwad: 'On the occasion of Guru Poornima, let's resolve to make the city corona-free as Gurudakshina, let's all use masks campaign on social media शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा आठ दिवसांचा लॉकडाउन करण्याची मागणी केली जात आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आज गुरुपोर्णिमेचे औचित्य साधत राजकीय नेत्यांकडून शहरवासियांना मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे. आज गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूदक्षिणा म्हणून या शहराला लवकर कोरोनामुक्त करण्याचा निश्चय करूया! सर्वांनी मास्क वापरावा, असे आवाहन नेत्यांकडून करण्यात येत आहे. सोशल मीडियावर त्याचा ट्रेन्ड सुरु केला आहे. ‘आता हे आपले रोजचेच टास्क, कोरोनाला हरविण्यासाठी कंपल्सरी मास्क…!असेही सांगत मास्क घालण्याचे आवाहन केले जात आहे.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा आठ दिवसांचा लॉकडाउन करण्याची मागणी केली जात आहे.

परंतु, दोन महिने लॉकडाउन करुन देखील कोरोनाचा प्रसार कमी झाला नाही. त्यामुळे आठ दिवस लॉकडाउन करुन कोरोनाचे रुग्णवाढ कमी कशी होईल, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नागरिकांकडून मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखने, सातत्याने हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन केले जात नाही. त्यामुळे लॉकडाउन करुनही काय उपयोग होणार नाही असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील 100 टक्के नागरिकांनी मास्क वापरला, सुरक्षित अंतर राखले, सातत्याने हात धुणे याचे व्यवस्थित पालन केले. तर, तो 80 टक्के लॉकडाउनच आहे. नियमांचे पालन केल्यास हा एकप्रकारचा लॉकडाऊनच होईल. त्यामुळे शहरवासियांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.

गुरुपोर्णिमेचे औचित्य साधत आज लोकप्रतिनिधींकडून सोशल मीडियाद्वारे नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन केले जात आहे. जसे गुरू आपल्या जीवनाला आकार देतो त्याचप्रमाणे या पिंपरी-चिंचवड शहराने आपल्याला घडवले आहे!

आज गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूदक्षिणा म्हणून या शहराला लवकर कोरोनामुक्त करण्याचा निश्चय करूया! सर्व नागरिकांना आवाहन सर्वांनी मास्क वापरावा. मास्क लावलेला आपला फोटो सोशल मीडियावर शेअर करा, पोस्टमध्ये हे हॅशटॅग जोडा, असे आवाहन केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.