Pavana Dam: पवना धरण परिसरात गेल्या 24 तासात 7 मिलिमीटर पाऊस, गेल्यावर्षीच्या तुलनेने पाणीसाठा 12.41 टक्के कमी

एमपीसी न्यूज : पिंपरी – चिंचवड शहरासह मावळवासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचे पुनरागमन गुरुवार पासून झाले आहे. (Pavana Dam) काल शनिवारी ते आज रविवारी सकाळ पर्यंत धरण क्षेत्रात 7 मिलिमीटर पाऊस झाला आहे. परंतु गेल्यावर्षीच्या तुलनेने आजचा पाणीसाठा 12.41 टक्कयांनी कमी आहे.

 

पवना धरण परिसरात गुरुवारी दिवसभरात 2 मिलिमीटर, शुक्रवारी दिवसभरात 34 मिलिमीटर व शनिवारी दिवसभरात 7 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसेच आज सकाळ पर्यंत एकूण 1626 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस 1968 मिमी होता. (Pavana Dam) त्यामुळे 342 मिमी पाऊस यावर्षी आज पर्यंत कमी झाला आहे. तसेच आजचा पाणीसाठा 81.23 टक्के आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 93.64 टक्के होता. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेने आजचा पाणीसाठा 12.41 टक्के कमी आहे.

 

पिंपरी चिंचवड शहारासह मावळ तालु्क्यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्या स्रोत पवना धरण (Pavana Dam) आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहरला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करून शहवासियांना पाणी पुरवठा केला जातो.

Poetry Publication: कवयित्री प्रा. रेखा पिटके-आठवले यांच्या ‘रेखाचित्रे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन 

पवना धरणातील परिस्थिती

गेल्या 24 तासात झालेला पाऊस : 7 मिमी.

1 जूनपासून झालेला पाऊस : 1626 मिमी.

गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस : 1968 मिमी.

धरणातील सध्याचा पाणीसाठा : 81.23 टक्के

गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा : 93.64 टक्के

गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ : 0.24 टक्के

आजची पाण्याची आवक: 0.58 द. ल. घ. मी 

आजपर्यंत पाण्याची आवक: 160.05 द. ल. घ. मी

धरणतील पाण्याचा उपयुक्त पाणीसाठा : 195.78 द. ल. घ. मी

धरणतील पाण्याचा एकूण पाणीसाठा : 226.92 द. ल. घ. मी

धरणातील पाणी पातळी: 611.15 मीटर

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.